Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपरी-चिंचवडमधील रस्तोरस्ती हेल्मेट विक्री अधिकृत?


Main News

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - हेल्मेटसक्तीची आवई उठल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेट विक्रीचे पीक आले आहे. शहराच्या बहुतांश मुख्य रस्त्यांवर धडाक्यात हेल्मेट विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकृत आहे काय? रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय? आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय? असे प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. वाहतुकीची काळजी करणारे पोलिस व वजनमापे विभागांच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे कमी दर्जाचे हेल्मेट खरेदी करणाऱ्या वाहनचालकांची फसवणूक होत आहे.
 
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने शहरांमध्ये हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. या सक्तीला लोकांचा विरोध झाल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईचे हात तूर्तास मागे घेतले. परंतु, सरकारच्या या फतव्यामुळे हेल्मेट विक्रीच्या बाजाराला मात्र तेजी आली आहे. काही वर्षांपूर्वीही असेच घडले होते. त्यावेळीही हेल्मेट विक्रीला तेजी आली होती. काही दिवसांनंतर पुन्हा हेल्मेट सक्ती मागे घेण्यात आली. लोकांच्या डोक्याचे संरक्षण किती झाले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला तरी व्यापाऱ्यांचे मात्र उखळ पांढरे झाले.
 
आता पुन्हा पिंपरी-चिंचवडमधील रस्तोरस्ती १०० रुपयांपासून हेल्मेट मिळत आहेत. कोणत्याही वस्तूंची रस्त्यावर अशी विक्री करता येत नाही. या विक्रीला वाहतूक पोलिस वा वजनमापे विभागाची संमती आहे काय? येथून मिळणारे हेल्मेट खरेच प्रमाणित झालेले आहेत काय? याबाबत वाहतूक पोलिस चुप्पी साधून आहेत. आयएसआयने प्रमाणित केलेल्या फार थोड्या कंपन्या भारतात आहेत. परंतु, रस्त्यांवर विक्री केल्या जाणाऱ्या हेल्मेटवर प्रमाणीकरणाची कोणतीही चिन्हे नसताना सर्रासपणे विक्री सुरू आहे.
 
अशा प्रकारची विक्री म्हणजे वाहनचालकांच्या जीवनाशी खेळण्यासारखे आहे. यामागे पोलिस व व्यापारी यांचे हितसंबंध तर गुंतले नाहीत ना? अशी शंका घेण्यात पुरेशी जागा आहे. या हेल्मेट विक्रीवर कोणतेही निर्बंध नाहीत. उलट पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे ही दुकाने रस्त्यांच्या बाजूला थाटली जात आहेत.
 
हेल्मेटच्या अधिकृत कंपन्या
स्टड, वेगा, स्टिलबर्ड, एरोस्टार
 
कोणत्या प्रमाणपत्रांची गरज
आयएसआय, ईसीई, वाहतूक विभाग
 
प्रमाणित हेल्मेटची किंमत किती?
आयएसआय, ईसीई प्रमाणपत्रे असलेल्या हेल्मेटची किंमत किमान ५०० रुपयांपेक्षा अधिक असते. ४०० रुपयांपर्यंत मिळणारे हेल्मेट सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहेत.
 
वजन किती असावे ?
हलके हेल्मेट सुरक्षितेच्या दृष्टीने घातक आहेत. चांगल्या व प्रमाणित हेल्मेटचे वजन १२५० ते १३५० ग्रॅमचे असते. त्यापेक्षा कमी वजनाचे हेल्मेट प्रमाणित नाहीत किंवा सुरक्षित नाहीत, असे समजावे. या वजनाची माहिती हेल्मेटच्या मागच्या बाजूला असते.
 
पुण्यात होते एलएस २ हेल्मेटची निर्मिती
हेल्मेटमध्ये एलएस २ हे प्रमाणित सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले असतात. हे हेल्मेट पुण्यातील लक्ष्मी ऑटोमोबाईलद्वारे निर्मिती केली जाते. हेल्मेट आर- २२ व ईसीई २२.५ प्रमाणित हेल्मेटही अधिकृत असतात.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin