Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


मासुळकर कॉलनी प्रभागात रस्त्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न बनला गंभीर


Main News

>> चार वर्षांत प्रभागात भरीव विकास नाही
>> दोन्ही नगरसेवकांचा केवळ चमकोगिरीवर भर असल्याचा इच्छुकांचा आरोप

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – म्हाडाने सुनियोजितपणे वसवि असलेल्या मासुळकर कॉलनी प्रभागात गेल्या ३० वर्षांपासून पाण्याचा प्रश्न तसाच आहे. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांनीही चार वर्षांत विशेष असे प्रयत्न केलेले नाहीत. प्रभागातील रस्ते अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. स्वतः नगरसेवकाच्या घरासमोरील रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करत नाहीत. उलट अशांना ते प्रोत्साहन देतात. प्रभागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत नगरसेवकांना गांभीर्य नाही. नगरसेवकांना निवडणुकीत दिलेल्या वास्तुउद्योग वसाहत पुनर्विकासाच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. चार वर्षात कोणतेही भरीव काम न करता दोन्ही नगरसेवक केवळ चमकोगिरी करतात, असा आरोप या प्रभागातील इच्छुकांनी केला.   

प्रभाग क्रमांक २८, मासुळकर कॉलनीमधून विनोद वरखडे, परिक्षीत वाघेरे, दत्तात्रय भालेराव, वर्षा भालेराव, प्रदीप चव्हाण आणि आशा काळे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, वास्तुउद्योग कॉलनी, उद्यमनगर आणि यशवंतनगर या भागाला गेल्या ३० वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रभागात जुनी पाईपलाइन आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागात पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी पाईपलाइन बदलण्याची गरज आहे. पाणीपुरवठा वेळी अवेळी केले जाते. त्यामुळे प्रभागातील सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. परंतु, हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नगरसेवकांनी चार वर्षांत कोणताही पाठपुरावा केला नसल्याबद्दल इच्छुकांनी खंत व्यक्त केली.

संपूर्ण प्रभागात सांडपाण्यासाठी चांगली व्यवस्था तयार करण्यात आली आहे. परंतु, उद्यमगनरमध्ये बिल्डरने नाल्यावर अतिक्रमण करून इमारत उभारली आहे. त्यामुळे याठिकाणी मुख्य रस्त्यावर सांडपाणी येते. सोफिया हॉटेलजवळ नेहमी सांडपाणी रस्त्यावर येते. त्याची दखल घेतली जात नाही. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या रोज येतात. परंतु, ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नाही. सर्वच सोसायट्यांमधील कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी प्राधान्य देत नाहीत. घंटागाड्या केवळ रस्त्याने शिट्टी मारून निघून जातात. प्रभागात अनेक मोकळे भूखंड आहेत. त्या जागेत नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे प्रभागीतल मोकळे भूखंड म्हणजे कचऱ्याचे आगार बनले आहेत. अशा मोकळ्या भूखंडधारकांना नोटिस पाठवून महापालिकेने दंड आकारण्याची गरज आहे. तसेच मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकू नये, यासाठी नागरिकांशी नगरसेवकांनी संवाद साधण्याची गरज असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागात चांगले रस्ते आहेत. वेळच्या वेळी डांबरीकरण केले जाते. परंतु, सर्व रस्ते अतिक्रमाणांनी व्यापलेले आहेत. फुटपाथ गायब झालेले आहेत. प्रभागातील एकही रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यातच स्पीड ब्रेकरचे प्रमाण जास्त आहे. खुद्द नगरसेवकाच्या दारासमोरील रस्त्यावरच अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे प्रभागातील रस्त्यावरून वाहन चालविण्यासाठी आणि पायी जाण्यासाठी जिव मुठीत घेऊनच बाहेर पडावे लागते. अतिक्रमण झालेल्या रस्त्यांवरून भरधाव वेगाने वाहने नेतात. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यांवरून चालणे धोकादायक ठरत आहे. रसरसंग चौकातून नागरिक रस्ता ओलांडू शकत नाहीत, अशी परिस्थिती बनली आहे. हा चौक अत्यंत रहदारीचा झाल्याने तेथे सिग्नल आणि वाहतूक पोलिसाची गरज असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

यशवंतनगर भागात मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी नगरसेवकांनी चार वर्षांत कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. या भागात सांडपाण्याची भयानक परिस्थिती आहे. येथील झोपडपट्टी घोषित असूनही त्याच्या पुनर्वसनासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केलेले नाहीत. प्रभागात कमी आरक्षणे आहेत. प्रभागात आजमितीला एक उद्यान आणि एक सांस्कृतिक भवन आहे. अंतरिक्ष सोसायटीजवळील मोकळ्या जागेत उद्यानाचे आरक्षण आहे. निवडणुकीत नगरसेवकांनी या जागेत उद्यान विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, नगरसेवकांना त्याचा विसर पडला आहे. वास्तुउद्योग वसाहतीच्या पुनर्विकासाचेही आश्वासन नगरसेवकाने दिले होते. या वासहतीतील इमारतींच्या भिंती कधीही कोसळतील, अशी परिस्थिती आहे. परंतु, नगरसेवकाला आपले आश्वासन लक्षात न राहिल्याने येथील नागरिक प्रचंड संतापले असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सकाळी आणि रात्री एकटा माणूस रस्त्याने जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यातही नगरसेवकांना अपयश आले आहे. प्रभागात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रसरंग चौकात खून करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. नगरसेवकाने प्रभागाच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून केवळ चमकोगिरी केली. त्यातून प्रसिद्धी मिळविली. परंतु, सद्यःस्थितीला हे कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत. काही भागात कॅमेरे असले तरी ते चालू आहेत किंवा नाही हे नगरसेवकांनीच जनतेला सांगावे, असे आव्हान इच्छुकांनी दिले. सीसीटीव्ही कॅमेरे असताना प्रभागातील व्यायामशाळेतील साहित्य चोरीला गेले. तसेच राधाकृष्ण मंदिरात चोरी झाली. वाढती गुन्हेगारी पाहता प्रभागात पोलिस चौकी होण्याची गरज इच्छुकांनी व्यक्त केली.

प्रभागात बांधण्यात आलेली भाजी मंडई कित्येक वर्षांपासून पडून आहे. व्यावसायिकांना त्याचा वापर करण्यास भाग पाडण्याऐवजी रस्त्यांवर सर्रासपणे अतिक्रमण करून व्यवयास करू दिला जातो. त्यासाठी नगरसेवकांना भाडे मिळत असल्याचा आरोप इछ्छुकांनी केला. प्रभागात विकासकामे करताना दोन्ही नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय दिसून येत नाही. प्रभागात समावेश होणाऱ्या अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या विकासावरून दोन्ही नगरसेवकांमध्ये प्रचंड वाद आहेत. स्टेडियमच्या आवारातील जलतरण तलावाचाही विकास नगरसेवक करू शकले नाहीत. प्रभागात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. त्याकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत. यशवंतनगरमधील महापालिकेच्या शाळेत प्रचंड अस्वच्छता असते. त्यामुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin