Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा


Main News

खडकी, दि. १८ (पीसीबी) - शेतकऱ्याने आत्महत्या करणे म्हणजे ''फॅशन'' झाली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी नारायण धोंडीबा आकुटे (वय ७२, रा. खेड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे ''फॅशन शो'' सारखी ''फॅशन'' बनत चालली आहे.  शेतकरी कुटुंबियांना मदत देण्याची हल्ली वेगवेगळ्या सरकारांमध्ये स्पर्धाच सुरू आहे. हे सरकार पाच लाख देते, तर दुसरे सरकार सात लाख रुपये देते,असे वादग्रस्त व्यक्तव्य शेट्टी यांनी केले. शेट्टीचे हे विधान शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल टिंगल उडवणारे असून त्यातून  शेतकऱ्यांची समाजात बदनामी झाली आहे, असे आकुटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कलम ५०० नुसार शेट्टी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin