Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


येरवड्यात सिलेंडरचा स्फोट ; अग्निशमनचे दोन जवान भाजले


Main News

पुणे, दि. १८ (पीसीबी) - पुण्यातील येरवडा परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलेंडर टाकीतून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. यामध्ये आग विझविण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे दोन जवान भाजल्याची घटना आज (गुरुवारी) घडली. 

किशोर सोनवणे व  सुनील देवकर अशी सिलेंडर स्फोटात भाजलेल्या जवानांची नावे आहेत. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, येरवड्यातील एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ दाखल झाले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी अरूंद रस्त्यामुळे आगीच्या ठिकाणी नेता येत नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून पाणी तेथे नेले व आग विझवण्यास सुरुवात केली. या प्रयत्नात सोनवणे व देवकर भाजले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin