Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


चऱ्होलीत बारावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या


Main News

>> पुणे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) -  लोणावळा, लोहगाव पाठोपाठ आज सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्याच्या आत्महत्येची आणखी एक घटना घडली. पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली येथे एका बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात अभ्यासाच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.
 
हृषीकेश राजाराम तापकीर (वय १८, रा. काळजेवाडी,  चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृषीकेश हा चऱ्होलीतील वाघेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याने राहत्या घरात अभ्यासाच्या खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. 

आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही 'सुसाईट नोट' आढळून आली नाही.  दरम्यान, उद्यापासून बारावीची परिक्षा सुरु होत आहे. या परिक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोणावळा व लोहगाव येथे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सलग दोन दिवस घडल्या. त्यापाठोपाठ आज पिंपरी-चिंचवडमध्येही घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आत्महत्येबाबत चिंता व्यक्त होत आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin