Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पक्ष लागले कामाला; नेते व इच्छुकांची “इमेज बिल्डिंग”साठी चढाओढ


Main News

पिंपरी, दि. १७ (भीमराव पवार) - आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक सक्रिय झाले आहेत. आंदोलन आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अस्तित्व दाखवण्यासोबतच सर्वसामान्यांमध्ये छाप पाडण्यासाठी “इमेज बिल्डींग”साठीही बहुतांश नेते व इच्छुक सक्रिय झाले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष झाल्यापासून भाजप अधिक सक्षमतेने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादीचे नेतेही वाढदिवस आणि महापालिकेच्या विविध कार्यक्रमांतून नव्या दमाने सुरूवात करण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवसेनेचे नेतेही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी बैठका आणि संपर्क कार्यक्रमांतून कामाला लागले आहेत. काँग्रेसमध्ये आता कुठे बदल होऊ लागले आहेत. येत्या काही महिन्यांत काँग्रेसही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
 
एक वर्षानंतर महापालिका निवडणुका अपेक्षित आहेत. “प्रभाग” की “वॉर्ड” याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर ती टिकवण्याचे आव्हान राहील, तर भाजपसमोर महापालिकेवर झेंडा फडकवण्याचे आव्हान असेल. निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) देखील सक्रिय झाले असले, तरी महापौरपद मिळवण्याइतके नेटवर्क यातील एकाही पक्षाकडे नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीत खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यातील बहुतांश पक्ष निवडणुकीत निर्णायक स्थितीत येता यावे, यासाठी धडपड करणार आहेत.
 
आमदार लक्ष्मण जगताप भाजपचे शहराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये दुफळी स्पष्टपणे दिसून येते. भाजपने अवघ्या काही महिन्यांत शहरात जोरदार वातावरणनिर्मिती केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ताकदीच्या इच्छुकांना रोखून ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी शांत झालेली असली तरी वातावरण निवळलेले नाही. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी विरोधी पक्षनेतेपद आपल्या गटाकडे खेचून आणले असले तरी येत्या काही महिन्यांत काँग्रेसमध्ये काय काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
शिवसेनेतही अंतर्गत गटबाजीला ऊत आले आहे. कोणा एकाचे नेतृत्व स्वीकारण्याची नेत्यांची मानसिकता नाही. त्यामुळे शहराचे नेतृत्व करणारा चेहरा शिवसेनेकडे नाही. संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांना ना कामाचा प्रभाव दाखविता आला आहे ना आंदोलने करता आली आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची गळचेपी होत आहे. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसू नये, यासाठी येत्या काही महिन्यांत काय रणनिती आखली जाते, याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. मनसेच्या नेत्यांचा अद्याप ठावठिकाणा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसेच्या चारपैकी किती नगरसेवक पक्षात राहतात, याबाबत नेत्यांमध्येच संभ्रम असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मनसेमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडीबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. रिपब्लिकन पक्षही (आठवले गट) हळूहळू सक्रिय होत असल्याचे चित्र आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin