Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


सुसगावमध्ये पूर्ववैमनस्यातून शेजाऱ्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एक ठार, दोन जखमी


Main News

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - पूर्ववैमनस्यातून शेजाऱ्याने पोटात चाकूने वार केल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य दोन शेजाऱ्यांवरही वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सुसगाव येथे आज (मंगळवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

नंदाबाई नारायण कांबळे (वय ४५, रा. खोली क्र. १५, शहाजी चांदेरे चाळ, सुसगाव, ता. मुळशी) असे शेजाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिला वाचविण्यासाठी गेलेले यशवंत परशुराम साळुंखे, योगिता यशवंत साळुंखे व पृथ्वीराज यशवंत साळुंखे (रा. खोली क्र. १३, शहाजी चांदेरे चाळ, सुसगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुकिंदा शेकू हाटे (वय ४१, रा. खोली क्र. १४, शहाजी चांदेरे चाळ, सुसगाव) याला अटक करण्यात आली आहे. पृथ्वीराज साळुंखे (वय १९) याने फिर्याद दिली आहे. 

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकिंदा हाटे, नंदाबाई कांबळे व यशवंत साळुंखे हे एकमेकांशेजारी राहतात. मुकुंदा व नंदाबाई यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. त्यातूनच आज सकाळी साडेसातच्या सुमारास मुकींदा हा नंदाबाई कांबळे यांच्या घरात शिरला व त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. पोटाला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या यशवंत साळुंखे यांच्या पोटात, मानेवर, तोंडावर, योगिता साळुंखे यांच्या पोटात व पृथ्वीराज साळुंखे यांच्या हातावर मुकिंदा याने चाकू खुपसून गंभीर जखमी केले. 

हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ए. टी. वाघमळे तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin