Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


मानसिक आरोग्याची काळची कशी घ्याल?


Main News

दि. ३१ (पीसीबी) – ज्याप्रमाणे आपले शरीर आजारी पडते त्याचप्रमाणे आपले मनही आजारी पडत असते. अशा वेळी मानसशास्त्रज्ञ यांचा सल्ला घेणे गरजेचे असते. यासंदर्भात आपल्याला आम्ही माहिती देणार आहेत. व्यक्तीची इतरांबरोबर सुसंवाद करता येण्याची, एक तानतेने सहसंबंध प्रस्थापित करण्याची किंवा सामाजिक परिस्थितीतील बदलांमध्ये विधायकरीत्या योगदान करण्याची क्षमता म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. शरीर-मन संबंध शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ अशी एक जुनी म्हण आहे; पण वैद्यकशास्त्राने मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ हाही प्रत्यय आणून दिला आहे. उदा. उद्या आपल्या परीक्षेचा निकाल आहे. रात्रभर आपल्याला काही केल्या झोप येत नाही. छातीत धडधड होते का? कारण मनाला लागलेल्या चिंतेचा शरीरस्वास्थ्यावर झालेला हा परिणाम कोठे आहे. आपण शरीरशास्त्राचा अभ्यास केला; पण मन नावाचे वेगळे इंद्रिय कोठेही नाही. मग मन म्हणजे काय? मन हा एक शरीराचा भाग आहे. ती वेगळी वस्तू किंवा इंद्रिय नाही, तर मन म्हणजे आपले वर्तन. आपल्याला भोवतालच्या परिस्थितीचे जे संवेदन होते त्यानुसार आपल्या मेंदूने मज्जसंस्थेने दाखविलेली प्रतिक्रिया यामध्ये मेंदूने मज्जासंस्था, विविध ग्रंथी अंतस्राव यांचा प्रतिसाद तर आहेच; पण त्यावर मानसिक व बौद्धिक घटकांचाही प्रभाव असतो. वर्तन म्हणजे काय? आपल्या ज्ञानावर आधारित आपली वैचारिक प्रक्रिया, आपल्या भावना, आपल्याला काय वाटते यास अनुसरून घडलेली कृती म्हणजे आपले वर्तन. म्हणून आपल्या वर्तनाला मनाचा आरसा म्हणतात. व्यक्ती हसतमुख, उत्साही, आशावादी असते. त्याने शारीरिक स्थिती चांगली राहते. अशा व्यक्ती शारीरिक आजाराच्या तक्रारी करीत नाहीत. शरीरस्वास्थ्याचा मनस्वास्थ्यावर परिणाम? ज्या व्यक्तीच्या भूक, तहान, झोप या मूलभूत शारीरिक गरजा समाधानकारकपणे भागत नाहीत त्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींमध्ये उदासीनता, चिडचिडेपणा, चित्त एकाग्र न करता येणे ही लक्षणे दिसून येतात. शरीरातील अंतर्स्रावी ग्रंथीचे कार्य बिघडून अंतर्स्राव कमी किंवा अधिक प्रमाणात स्रवल्यास त्याचाही मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. उदा. हायपोथॉयराईडीझम असलेली व्यक्ती निराश, हळवी असते. भावना व शरीरातील अंतर्स्रावी ग्रंथी यांचाही संबंध निकटचा असतो. मानसिक आरोग्याचे घटक : शारीरिक आरोग्य - निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती, शास्त्रोक्त विचार करण्याची वृत्ती, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती यांचा विकास करणे, आपल्या क्षमतांची, उणिवांची जाणीव असणे, आपल्या क्षमतांचा योग्य वेळी, योग्य प्रकारे उपयोग करणे, बौद्धिक आव्हाने स्वीकारणे इत्यादी. बौद्धिक आरोग्य - रोगांपासून संसर्गापासून दूर राहणेकरिता लसीकरण, समतोल आहार, योग्य विश्रांती, झोप, व्यायाम, खेळ त्याचप्रमाणे आरोग्य वृद्धींगत होण्यासाठी चांगल्या जीवनशैलीच्या सवयी आत्मसात करणे गरजेचे आहे. सामाजिक आरोग्य : सहकार्य, देवाण-घेवाण, आंतरवैयक्तिक संबंध टिकवून ठेवणे, इतरांचा आदर करणे, सामाजिक नियमानुसार वर्तन करणे इत्यादी. आनंदी, समाधानी, शांत असणे, आनंदाबरोबर दु:ख, यशाबरोबर अपयश, नैराश्य, राग, लोभ, मोह, मद, मत्सर या सर्व भावनांवर बौद्धिक कौशल्यतेचा वापर करून नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे. योग्य वेळी योग्य प्रकारे प्रकटीकरण महत्त्वाचे आहे. आयुष्यात हेतू असणे व तोरा करण्यासाठी जगणे, भावनिक तोल बिघडू न देता वास्तव स्वीकारून परिस्थितीला तोंड देणे, व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडणे, सामाजिक संबंधाची योग्य जाण असणे, सामाजिक समायोजन साधणे, या व्यक्ती प्रखर भावनांवर ताबा मिळवू शकतात व त्यानुसार योग्य निर्णय व कृती खंबीरपणे करतात. या व्यक्तींना दुसर्याबद्दल प्रेम व आस्था असते. अशा व्यक्तीस सभोवतालची किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तींची जबाबदारी असते. या व्यक्ती स्वतःला खूप मोठे किंवा खूप कमी लेखत नाहीत. आपली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी अडचणीवर मार्ग काढत प्रयत्नशील राहतात. या व्यक्तींचे सामाजिक वर्तन हे सर्वसामान्य असते. रोजच्या सामाजिक जीवनातील मागण्या या व्यक्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात व ते करत असताना अडचणींच्या प्रसंगावर सहजपणे मात करतात. आपल्या वर्तणुकीने कोणाला त्रास न होऊ देता या व्यक्ती समयसूचकता, तारतम्य व हुशारीने वागतात. स्वतःबाबत तो समाधानी असतो. म्हणजे तो हवा तेवढा निर्भय आणि संतुष्ट असतो. तो स्वतःच्या गुणवत्तेस कधीही कमी अथवा जादा लेखत नाही. तो स्वाभिमानी असतो; परंतु आपल्या स्वतःच्या चुका-दोष तो खुल्या दिलाने स्वीकारतो. मानसिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण माणूस इतरांशी सहजपणे जमवून घेऊ शकतो. त्याची मैत्री अर्थपूर्ण असते आणि दीर्घकाल टिकते. तो स्वतःच इतरांपेक्षा वेगळा समजत नाही. तो स्वतःच गट वा समाजाचाच एक घटक समजतो. त्याचे पाय वास्तवाच्या जमिनीवर पक्के रोवलेले असतात. तो दिवास्वप्ने पाहात नाही. मानसिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण माणूस आयुष्याच्या गरजा पूर्ण करू शकतो. तो स्वतःबद्दल विचार करू शकतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. तो स्वतःसाठी साध्य होतील अशीच ध्येये ठरवतो. द्राक्षे आंबट आहेत असे म्हणण्याची त्याला सवय नसते. दैनंदिन जीवनातील स्वतःच्या जबाबदार्या तो यशस्वीपणे पेलतो.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin