Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


अत्ता लठ्ठपणा टाळता येणे शक्य..


Main News

दि.३० (पीसीबी) - आहाराचे नियोजन किंवा व्यायाम केल्यानंतरही वाढणारे वजन कमी होत नसेल तर लठ्ठपणाच्या समस्येविरोधात ब्रिटिश संशोधकांनी उपाय शोधून काढला आहे. संशोधकांनी असा एक पदार्थ शोधून काढले आहे, ज्यामुळे या समस्येपासून काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. संशोधकांनी एका उंदरावर याचे परीक्षण करताना हा पदार्थ ग्रहण केल्याने या प्राण्यांच्या शरीरातील अतिरक्त वजन कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले. यासाठी शरीरातील आनुवंशिक घटकदेखील मदतशीर ठरतात. कारण शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट करण्यासाठी आहाराचे नियोजन हे जरी काही लोकांसाठी गुणकारक ठरत असले तरी अशा प्रकारच्या उपचारांमधून घडणारे वर्तणुकीतील बदल जे सर्वसाधारण लोकसंख्येला दीर्घकाळ करणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे. संशोधकांना असे आढळून आले की, शरीरातील एसआरएसएफआय, एसआरएसएफ ५ आणि एसआरएसएफ ६ या प्रथिनांमुळे आणि लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आहारामुळे उंदराच्या शरीरातील अतिरिक्त वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी एसआरएसएफआय या घटकाला प्रतिबंधित केल्यास लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना रोखणे सहज शक्य आहे, असे संशोधकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin