Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्याल


Main News

दि. २५ (पीसीबी) – प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात काही ठराविक बदल होत असतात आणि या बदलांचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि अॅलर्जी यासरख्या समस्यांना सामोरे जावे लागते पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे आपल्याला गंभीर आजारांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. पण खरेतर हिवाळ्यात काही लहान चुका करणे टाळले तर या ऋतूचा खरा अनंद लुटणे सहज आणि सोपे आहे.

यासाठी आपण  हिवाळ्यात कोणती काळजी घ्याल… 

१. कमी पाणी पिणे-
उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात तहान कमी लागते.खरेतर ऋतू कोणताही असला  तरी तुमच्या शरीराला पुरेश्या पाण्याची गरज ही असतेच.पण थंड वातावरणात शारीरिक श्रम कमी झाल्याने आपण पाणी कमी पितो.ब्रिटीश डाएटीक असोशिएशननुसार हिवाळ्यात देखील आपले शरीर हायड्रेट असण्यासाठी दररोज कमीतकमी २ लिटर पाणी पिण्याची गरज असते.पण पुरेसे पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन मुळे किडनीच्या समस्या,अपचन असे त्रास होतात.हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने देखील चांगला फायदा होतो.मात्र त्याऐवजी आपण या दिवसांमध्ये चहा, कॉफी अधिक प्रमाणात सेवन करतो.पाण्याची कमतरता व कॅफेनचे अधिक प्रमाण याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.  जाणून घ्या किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती पाणी प्यावे?

२. खुप गरम कपडे घालणे-
हिवाळ्यात स्वेटर,पुलओवर्स,शाल अशा गरम कपड्यांमुळे खुप उबदार वाटते.पण थंडीत सतत असे कपडे घालून ठेवणे हितकारक नाही.यामुळे शरीरात अधिक प्रमाणात घाम येतो ज्यामुळे तुम्हाला जास्त थंडी वाजू शकते. तुमच्या स्नायूंना उष्णता मिळेल व त्वचा कोरडी होणार नाही यासाठीच गरम कपडयांच्या वापर करावा.दिवसभर गरम कपडे घालून ठेवणे टाळावे.

३. हात आणि पायात मोजे घालणे-
ग्लोव्ज आणि मोजे घातल्याने हात व पाय उबदार राहतात.हात व पाय हे आपल्या शरीरातील असे अवयव आहेत जे बाहेरच्या शरीराला वातावरणाशी अनुकूल राहण्यास मदत करतात.हात-पाय मोजे घालून सतत झाकून ठेवल्याने शरीराला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेताना समस्या होतात.यासाठी रात्री मोजे घालून झोपू नका.रात्रीचे मोजे घालून झोपल्याने हातापायांमधील रक्ताभिसरण होण्यास अडथळा निर्माण होतो.ज्यामुळे हातपायामध्ये रक्त जमा होण्याचा धोका वाढतो.

४. खाण्यापिण्याची चंगळ-
हिवाळ्यात जास्त प्रमाणात वजन वाढते.थंडीमध्ये ब-याचदा तळलेले व जास्त तेला-तुपाचा वापर केलेले जंक फुड खाल्ले जातात.तसेच या दिवसांमध्ये थंड वातावरणामुळे व्यायाम व वर्कआऊट कडे देखील दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे कमी व्यायाम व जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्याने वजन वाढते.यासाठी थंडीमध्ये ताज्या भाज्या व फळे भरपूर खा.यासाठी हिवाळ्यात बर्गर व पिझ्झा ऐवजी भरपूर संत्री,बेरीज अशा फळांचा आहारातील समावेश वाढवा.

५. जास्त झोप-
आपल्याला हिवाळा खुप आवडतो कारण थंडीत ऊबदार ब्लॅकेट ओढून झोपण्यात एक वेगळीच मौज असते.जास्त झोपल्याने हिवाळ्यात आपण सकाळी उशीरा उठतो.दुपारी झोपल्याने फ्रेश वाटते म्हणून दुपारी एखादी डुलकी काढतो.या सर्व गोष्टींचा आपल्या झोपेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. ज्यामुळे वर्षभर आपल्याला जास्त झोपण्याची सवय लागते ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जाणून घ्या नवजात बाळांपासून वयोवृद्धांना नेमकी किती तास झोप आवश्यक आहे ?

६. घरामध्ये राहणे-
बर्फाळ प्रदेशात राहणा-या लोकांना घरातच रहावे लागते पण तरी त्यांनीही कमीतकमी संध्याकाळी बाहेर फेरफटका मारणे फायद्याचे ठरु शकते.थंडीत बागेत फिरल्याने रक्ताभिसरण योग्य रितीने होते ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशी उष्णता निर्माण होते.

७.  क्रीम आणि लोशनचा अतिवापर-
थंडीमध्ये क्रीम किंवा लोशन वापरल्याने त्वचा कोरडी होत नाही.पण अशा क्रीमचा अति वापर केल्यास तेलकट त्वचेमुळे तुम्हाला अॅक्ने,रॅशेस आणि स्कीन अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते.

८. सनस्क्रीन न वापरणे-
थंडीमध्ये सुर्यप्रकाशात फिरल्याने ऊबदार वाटते.पण उन्हात फिरताना सनस्क्रीनचा वापर जरुर करा.लक्षात ठेवा हिवाळ्यातील सुर्यप्रकाशाचा देखील उन्हाळ्याप्रमाणेच त्रास होऊ शकतो.यासाठी सर्न बर्न आणि त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी त्वचेवर चांगल्या सनस्क्रीन चा वापर जरुर करा. हे नक्की वाचा व्हिडिओ: कशी कराल योग्य सनस्क्रिनची निवड ?

९. घरी कपडे सुकवणे-
बरेच लोक कपडे घरीच सुकवतात.पण अशा प्रकारे कपडे ड्राय करताना त्यातून काही ऑरगॅनिक कंपाउंड बाहेर पडतात.ज्याचा लहान मुले व मोठ्यांच्या श्वसन प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो.जर तुम्हाला घरात कपडे सुकवण्याशिवाय पर्याय नसेल तर कृपया घराच्या खिडक्या उघड्या ठेवा ज्यामुळे घरातील हवा खेळती राहील.

१०. वारंवार औषधे घेणे-
जर तुम्हाला थंडीत होणा-या सर्दी-खोकल्यावर वारंवार औषधे घेण्याची सवय असेल तर अशी औषधे घेणे टाळा.कारण सतत औषधे घेतल्याने तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो.अशी औषधे तुम्हाला नैसर्गिकरित्या आजार बरा करण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेदेशीर नसतात  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin