Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


थंडीत कशी घ्याल त्वचेची काळजी


Main News

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) - थंडी न आवडणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. गुलाबी थंडीची मजा काही वेगळीच असते. काही जणांना ब्लँकेटच्या आत शिरून सुट्टीच्यादिवशी बेडमध्ये पडून राहायला आवडते, तर काहीजण सकाळच्या गारव्यात नियमितपणे मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसतात. पहाटे अथवा रात्री उशिरा थंडीत गरमागरम चहा घेणे म्हणजे अनेकांसाठी जणू सोहळाच असतो. थंडीचा आनंद लुटत असताना या वातावरणाचा शरीरावर काही विपरीत परिणामदेखील होत असतो. रुक्ष त्वचा, ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे त्वचेशीनिगडीत हे प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. थंडीचा आनंद घेताना यावर कशी मात करावी यासाठी येथे देण्यात आलेल्या काही टिप्स लाभदायक ठरतील.

त्वचा खोलवर मॉश्चराईज ठेवणे गरजेचे  
थंडीत रुक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणे शक्य नसल्यास ‘कोको बटर क्रिम’चा वापर करणे उत्तम राहील. या क्रिमच्या वापराने केवळ शरिराला सुगंधच प्राप्त होतो असे नाही, तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑइलने शरिराला हलक्या हाताने मसाज करणे. यामुळे शरिरातील मॉश्चर कायम राहाण्यास मदत होऊन त्वचा मऊ राहते. चेहऱ्यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रिमची निवड करा.

मुलायम ओठांसाठी  
अनेकजण फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावतात. परंतु, हा पर्याय खरोखरीच योग्य आहे का हा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहाण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.

पायांच्या भेगांवरील उपाय 
पायांच्या भेगांना थंडीत शरीरातील ओलावा कमी होत असल्याने प्रामुख्याने त्वचेवर याचा विपरित परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो टाचांवर. पायांवरील भेगामुंळे काहींना तर चालणेदेखील कठीण होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरिन आणि गुलाब पाण्याने रोज हलका मसाज घेतल्यास आश्चर्यकारक फरक जाणवेल.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin