Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


वृत्तपत्रात बांधलेले पदार्थ आरोग्यासाठी घातक


Main News

दि. १३ (पीसीबी) – रस्त्यावर विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेताना विक्रेता वृत्तपत्रातून आपल्याला पदार्थ देत असतो. मात्र हे पदार्थ आपल्यावर जीवावर बेतू शकतात. वृत्तपत्रासाठी वापरलेल्या शाईमुळे हे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नव्हे तर वृत्तपत्राच्या कागदामुळे कर्करोग होवू शकतो असा इशारा भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय)ने दिला आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सर्रासपणे वृत्तपत्राचा वापर होत असतो. त्याशिवाय तेलात केलेल फराळ, खाद्यपदार्थ केल्यानंतर पदार्थातील तेल शोषण्यासाठी वृत्तपत्रात काढले जातात. पदार्थ बनवताना आरोग्याच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली तरी ते वृत्तपत्रामुळे हे पदार्थ आरोग्यास हानीकारक ठरु शकतात. असे ‘एफएसएसआय’ने म्हटले आहे.

वृत्तपत्रांतील शाईमुळे वापरण्यात येत असलेल्या केमिकलमुळे अन्नपदार्थ दूषित होतात. वृत्तपत्राच्या छपाईमुळे लागणाऱ्या शाईमध्ये हानीकारक रंगाचाही वापर केला जातो. त्याशिवाय वृत्तपत्राच्या कागदातही घातक असतात. कागदाचा पुर्नवापर करुन तायर करण्यात आलेले कागद, कागदी बॉक्समध्येही विषारी रसायने आढळतात. यामुळे पचन संस्थेच्या आजार होण्याची शक्यता असल्याचे ‘एफएसएसआय’ने म्हटले आहे. 

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्यामुळे कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. याचा त्रास ज्योष्ठ नागरिक, लहान मुले आणि आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना अधिक होणार असल्याचेही 'एफएसएसएआय'ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

ग्राहकांनी विक्रेत्यांना वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ देणे बंद करण्यास सांगण्याबाबत आग्रह धरायला हवा असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले. सर्व राज्यांमधील अन्नसुरक्षा आयुक्तांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश 'एफएसएसएआय'ने दिले आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin