Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी लाभ


Main News

मधुमेहात जांभळामुळे साखर नियंत्रित करणे शक्य होते. चवीला छान लागणारे जांभूळ साखरेबरोबरच अनेक आजारांवर नियंत्रण ठेवते. जांभळाच्या सेवनाचे अनेक फायदे असून, विविध आजार दूर ठेवता येऊ शकतात. जाणून घेऊ या जांभळाचे फायदे. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर का तुम्हाला कारल्याचा कडू रस प्यायचा नसेल, तर पारंपरिक औषध असलेल्या जांभळाचा वापर करु शकता. जांभळात ग्लूकोसाइड तत्व असून, जम्बोलन नावाने ते ओळखले जाते. या तत्वाचा अॅण्टी-डायबेटिक प्रभाव पडतो. यात साखरेची मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची क्षमता असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. त्याचबरोबर मधुमेहामुळे होणारे अन्य त्रासदेखील कमी करण्यास मदत होते. जांभळातील ग्लाइमिक इंडेक्समुळे ५ ते ७ जांभळे खाल्याने अथवा एक कप गरम पाण्यात एक जमचा जांभळाची पावडर मिसळून दिवसातून दोनदा असे पाणी प्यायलाने लाभ होतो. पचनासाठी फायदेशीर- जांभळातील औषधी गुणवत्तेमुळे केवळ शरीरातील साखरच नियंत्रणात येत नाही, तर पचनक्रियेसाठीदेखील याचा फायदा होतो. जांभळाच्या सेवनाने पोटाशी निगडित अनेक समस्या दूर होतात. कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम आणि विटॅमिन सी सारखी शरीराला फायदेशीर असणारी अनेक तत्वे जांभळामध्ये असतात. ह्दयविकारावर गुणकारी- जांभळात पोटॅशिअमची मात्रा अधिक असते. १०० ग्रॅम जांभळाच्या सेवनाने शरीराला ५५ मिलीग्रॅम पोटॅशिअम मिळते. परिणामी ह्दयचा झटका, उच्च रक्तदाब आणि अर्धांगवायूचा धोका कमी होतो. त्याचबरोबर जांभळातील अॅलेजिक अॅसिड, अँथोसाइनिंगसारखी अनेक तत्वे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतात. जांभूळ हाडांसाठी जसे गुणकारी आहे तसेच ते रक्तासाठीदेखील फायदेशीर आहे. अॅनिमिक लोकांसाठी जांभळ सेवन एखाद्या संजीवनी बुटीसारखेच आहे. जांभळाच्या नियमित सेवनाने रक्तामधील हिमोग्लोबिनच्या स्तरात वाढ होत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin