Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


श्रावण महिन्यात मांसाहार बंद करणे लाभदायक


Main News

श्रावण महिन्यात मांसाहार बंद करणे लाभदायक श्रावण महिना म्हटले की जसे ऊन पावसाचा खेळ आणि निसर्गातील हिरवळ लगेच डोळ्यासमोर येते, तसेच श्रावण महिन्यात मांसाहार बंद करून उपवास, व्रत वैकल्य केली जातात. याला धार्मिकेतेबरोबरच शास्त्रीय कारण आहे. काही धार्मिक विधिनियमानुसार किंवा पूर्वापार चालत आलेल्या काही चालीरीतींमुळे श्रावण महिन्यात वा चातुर्मासात मांसाहार बंद केला जातो, पण धार्मिकच कारण या मागे आहे असे नाही तर शास्त्रीय कारण आहे, असेही यावरून दिसते. या ऋतुत पचनशक्ती मंदावलेली असते. मांसाहार केल्याने पचण्यासाठी खूप वेळ लागतो, तसेच पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. त्यातून अपचन, पित्त यासारख्या व्याधी सुरू होऊ शकतात. मांसाहार बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेल व मसाल्यांमुळे यात अधिकच भर पडू शकते. आधी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले असेल तरच पुढील घेतलेल्या जेवणाचा ताण येत नाही. नैसर्गिकरीत्याच जेव्हा पचनशक्ती अल्प असते तेव्हा तिच्यावर मांसाहार केल्याने आणखीनच ताण येऊन ती अशक्त होऊ शकते. या दिवसातील केवळ शाकाहाराने पचनशक्तीवर तेवढ्या प्रमाणात ताण येत नाही. आतड्यांच्या हालचाली मंदावत नाहीत. पित्ताच्या तक्रारी व पचनाच्या तक्रारी त्यातून उद्भवत नाहीत व आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व त्यातून कार्यक्षमता वाढीस लागते. म्हणूनच कमीत कमी श्रावणात का होईना मासांहार टाळून या तक्रारी दूर कराव्यात.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin