Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


"मातृस्तन्य हेच बालांमृत"


Main News

दि १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने प्रत्येक स्त्रीच्या ह्या संवेदनशील विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा छोटा प्रयत्न

स्तनपान करायचे की  नाही ?
बऱ्याच कामाला जाणाऱ्या स्त्रियांना पडलेला हा प्रश्न आहे. स्तनपान  केल्याने छाती ढिली पडते लोंबते , शरीर सुटू लागते. बाळाला सर्व व्हिटामिन्स व मिनरल्स मिळत नाही जे कि इतर डब्याच्या दुधात असतात. त्यामुळे अंगावर पाजू नये. असा बऱ्याच शिकलेल्या  स्त्रियांचा दृष्टिकोन असतो जो अत्यंत चुकीचा आहे  तो कसा ते बघूया.

आईच्या दुधाचे बाळाला होणारे फायदे -
१ मातेच्या दुधात बालकांच्या बुद्धीच्या विकासासाठी लागणारे सर्व घटक असतात म्हणून यास संपूर्ण आहार असेही म्हणतात.
२ मातेचे दूध पिणाऱ्या बालकांचा बुद्धी अंक हा इतर बालकांपेक्षा १० टक्के जास्त असतो असे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे.
३ आईचे दुधात काही प्रकारचे अँटी इंफेक्टिव्ह घटक असतात ते बाळाचे श्वसनाचे, आतड्याचे विकार इतर ही काही  वायरल इंफेक्शन पासून बचाव करतात.
४ आईच्या दुधाने पोषीत बालकांमध्ये पुढील आयुष्यात उच्चरक्तदाब, सांध्यांचे विकार, स्थूलपणा होण्याची शक्यता कमी असते.
५ या दुधात असणारे फ्री फँटी ऍसिड बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी मदत करते.
६ दूधातील टॉरिन नावाचे घटक डोळ्यांसाठी हितकारक असतात.
७ गवळी किंवा औषधी कंपन्यांकडून होणारी फसवेगिरी आईच्या दुधाबाबतीत होत नाही त्यामुळे दुधातील पोषक मूल्य १०० टक्के खात्री दायक असतात.
आईला होणारे फायदे-
१ स्तनपानाद्वारे आईला अन्य गर्भधारणेपासून ९८ टक्के संरक्षण मिळते.
२ स्तनपान केल्यामुळे गर्भाशय संकोच होण्यास मदत मिळते.
३ दूध पाजणाऱ्या आईला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
४ दूध पाजल्यामुळे गर्भारपणात साचलेला मेद कमी झाल्यामुळे आईची फिगर उत्तम राहते.

बाळाला दूध देणे कधीपासून सुरु करावे ?
बाळ जन्माला आल्या आल्या  डॉक्टरांनी बाळाला तपासल्यावर लगेच त्याला आईचा स्पर्श द्यावा. त्याला आईच्या दोन्ही स्तनाच्या मध्ये पालथे झोपवावे म्हणजे ते बाळ स्वतः च आईचे स्तन शोधून दूध प्यायला सुरवात करेल ( साधारणतः अर्धा तासात) यालाच ब्रेस्ट क्राऊल असे म्हणतात. सिझेरियन डिलेव्हरी झाली असल्यास आई शुद्धीवर आल्यावर लगेचच बाळाला दूध पाजावे.
डिलेव्हरी नंतरचे २-३ दिवस जे चिकाचे  दूध येते ते बाळाला देऊ कि नये ?
अर्थातच द्यावे त्यात चिकाचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यात अत्याधिक मात्रेत प्रथिने विटामिन A, E, D, K अँटिबायोटिक्स  असतात. जे बाळाचे पोषणास उत्तम असतात. या दुधात रोगप्रतिकार शक्ती भरपूर असल्याने कावीळ इ. व्याधी होण्याचा धोका टाळतो. 

बाळाला कसे पाजावे ?
स्तनपानाच्या सुरवातीला काही दिवसात नवीन किंवा अनुभव नसणाऱ्या मातेला हि कठीण समस्या ठरते हताश घेऊन काही माता दूध पाजणे सोडून देतात म्हणून मातेला याची माहिती असणे अनिवार्य आहे
बाळास दूध पाजण्यापूर्वी हात व स्तन  स्वच्छ धुवावे, शांत व एकांत ठिकाणी बाळाला दूध शक्यतो बसून पाजावे झोपून पाजू नये, दूध पाजताना सर्व लक्ष बाळावरच असावे त्याला गुंडाळलेले कपडे सैल करून पाजावे,पाजताना बाळाला जागे करावे, आईच्या हाताचा व पोटाचा आधार घेऊन बाळाला असे  आडवे धरावे कि जेणेकरून बाळाचे डोके हे थोडाफार पोटाच्या वर असावे, स्तनाचा पूर्ण काळा भाग बाळाने तोंड मोठे उघडून चोखणे अपेक्षित आहे. यासाठी हाताची सर्व बोटे स्तनाच्या खाली व अंगठा वर  ठेऊन स्तन जरा आवळून धरावे म्हणजे बाळाला दूध छान घेता येईल स्तन हे बोटांच्या कात्रीत पकडून दूध देऊ नये, दूध पाजताना बाळाच्या नाकावर व तोंडावर दाब पडणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे बालकास श्वास घेताना त्रास होणार नाही, दूध पाजल्यानंतर स्तन सुती कापडाने पुसुन घ्यावे व कोरडे करावे तसेच दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे, बाळाचेही ओठ व आजूबाजूचा भाग ओल्या मऊ कपड्याने प्रत्येक वेळी स्वच्छ पुसून घ्यावा.
 
बाळाला कधी दूध घ्यावे / दूध पाजण्याचा वेळा कशा असाव्यात ?
पहिल्यांदा माता बनलेल्या स्त्रीला  आपल्या बाळास योग्य मात्रेत दूध पुरते किंवा नाही या विषयी शंका असते . स्तनपानानंतरही जर बाळ रडत असेल तर त्याला योग्य मात्रेत दूध मिळत नाही असा काही आईचा समज आहे परंतु भुकेशिवाय बाळ रडण्याचे इतर अनेक करणे असू शकतात. म्हणून जर बाळ दूध पिल्यानंतर २-३ तासापर्यंत रडत नसेल गाढ झोपेत असेल त्याचबरोबर त्याचे वजन जेवढ वाढले पाहिजे तेवढे वाढत असेल म्हणजे १० व्या दिवसांपासून ते ३ महिन्यापर्यंत बाळाचे वजन प्रत्येक दिवशी २५ gm ऐवढे साधारणतः वाढते  तर बाळास पुरेसे दूध मिळत आहे असे समजावे यासाठी साधारण २४ तासात ८ वेळा दूध पाजावे .

लेखक –

डॉ अंकिता शिरकांडे MD, B.A.M.S, CGO, Yogpraveshak
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी
अधिव्याख्याता रसशास्त्र विभाग mob 9766588108 email - drankitaingole@gmail.com
 
डॉ. अभिजित शिरकांडे  MD, BAMS, D.Y.A, C.C.H, MA (संस्कृत)
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी
अधिव्याख्याता, द्रव्य गुण विभाग mob 9975253664 email - drabhijitshirkande@gmail.com

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin