Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


भारतात गेल्यावर्षी १.९६ लाख जणांना एचआयव्ही विषाणूंची लागण


Main News

भारतात गतवर्षी १.९६ लाख जणांना एचआयव्ही विषाणूंची लागण झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. तर जगभरात एकूण २५ लाख जणांना या विषाणूंची लागण झाली आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसेस’ (जीडीबी) यांनी ‘द लँसेट’ या एचआयव्ही नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. 

 भारतात २८.८१ लाख लोक एचआयव्हीसह जीवन जगत असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २००५-२०१५ या कालावधीत ०.७ टक्के या गतीने एचआयव्हीचा प्रसार झाला. तर १९९७ ते २००५ या कालावधीत एचआयव्ही प्रसाराचा वेग २.७ टक्के इतका होता.

‘जीडीबी’ने दिलेल्या माहितीनुसार एचआयव्हीसह जगणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २००० मध्ये २७.९६ दशलक्ष असलेली ही रुग्णसंख्या २०१५ पर्यंत ३८.८ दशलक्ष इतकी झाली आहे. एचआयव्ही/एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मात्र घट झाली आहे. २००५ मध्ये एचआयव्ही/एड्समुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १.८ दशलक्ष इतकी होती ती २०१५मध्ये १.२ दशलक्षपर्यंत कमी झाली आहे. एचआयव्ही/एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटविण्यात ‘अँटायरट्रोव्हायरल’ (एआरटी) उपचारांचा मोठा वाटा असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.

 २००५ ते २०१५ या कालावधीत ‘एआरटी’ उपचारांमुळे एचआयव्ही रुग्णांमध्ये पुरुषांचा जगण्याचा कालावधी ६.४ वरून ३८.६ टक्के इतका तर महिलांचा ३.३ वरून ४२.४ टक्के वाढला. नव्याने एचआयव्ही विषाणूंची बाधा होण्याचे प्रमाण घटले असून १९९७ मध्ये ३.३ दशलक्ष असलेले हे प्रमाण २.५ दशलक्ष इतके कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin