Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


घरगुती उपायांनी पळवा पावसाळी आजाऱ्यांना !


Main News

सध्या  पावसाला जोरात सुरवात झाली आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास हा पावसाळा सुसाह्य होईल, पावसाळा  पोटाचे आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार घेऊन येतो. डेंग्यू, मलेरिया, न्युमोनियाचा धोकाही असतो. या दिवसात बहुगुणी ठरू शकणारे घरगुती उपाय येथे देत आहेत.

कलमी - सर्दी, खोकला, घशाची खवखव यापासून कलमी आराम देते. अर्धा चमचा बारीक केलेल्या कलमीमध्ये मध मिसळून त्याचे दिवसातून दोनदा सेवन करावे. पावसाळ्यात लहान इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी काही उपाय. 

कडूलिंबाची पाने  - व्हायरलपासून चटकन सुटका मिळविण्यासाठी कडुलिंबाची दहा ते बारा पाने उकळून घ्या. हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

तुळस - यातील अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टी फंगल गुण घशातील खवखव, ताप, मलेरिया यापासून मुक्ती देतात. दहा ते १५ तुळशीची पाने एक कप पाण्यात चांगली उकळून घ्यावी. त्यानंतर चहाप्रमाणे ते घ्यावे. नक्की फायदा होईल. 

चमेली फुलाची पाने  - यातील अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टी व्हायरल गुणधर्म सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते. चमेलीच्या फुलाच्या पानांचा रस काढावा. एक चमचा रसात मध मिसळून त्याचे सेवन करावे. हा उपाय दिवसातून दोनदाच करता येईल. 

मध - मधात अॅन्टीऑक्टिडन्ट तत्व असतात. एक चमचा मध कोमट पाण्यात लिंबाच्या थोड्या रसासोबत घेतल्याने कफापासून आराम मिळतो. हे दिवसातून एकदाच करावे. 

लसूण - लसणात अॅक्टिबॅक्टेरीयल गुण असतात. तीन ते चार लसणाच्या पाकळ्या वाटून घ्या किंवा कच्च्या खा. त्यामुळे सर्दी आणि ताप नाहीसा होईल. 

हळद - गरम पाण्यात एक चमचा हळद मिसळून पिल्याने आराम मिळतो. हळदीत अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टी व्हायरल गुणधर्म आहेत. त्यामुळे चटकन आराम मिळतो. 

आले - आल्याचा छोटा तुकडा पाण्यात उकळून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चहासारखे प्या.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin