Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


निद्रानाश एक गंभीर समस्या


Main News

निद्रानाश ही जगभरातील अनेकांना सतावणारी समस्या आहे. कोणत्याही वयातील पुरुषाला किंवा स्त्रिला ही समस्या जाणवू शकते. निद्रानाशाची व्याख्या तशी सोपी आहे. झोप न लागणे किंवा प्रदीर्घकाळ झोपू न शकणे म्हणजे निद्रानाश होय. निद्रानाशाचे अनेक प्रकार असून, अनेकांच्या दृष्टीने ही समस्या वेगवेगळी असू शकते. अल्प किंवा तीव्र निद्रानाश हा एक प्रकार आहे. हा त्रास काही दिवसांपुरताच जाणवतो. विशिष्ट औषधांचे सेवन किंवा जीवनशैलीतील छोट्याशा बदलामुळेही तात्पुरत्या स्वरूपात उद्‌भवतो. चिरकालीन निद्रानाशाच्या रुग्णाला ‘इन्सोम्नियाक’ या नावाने संबोधले जाते.

लक्षणे आणि परिणाम
१. झोप न लागणे
झोप न लागणे हे निद्रानाशाचे मूलभूत लक्षण आहे. चांगली झोप येण्यासाठी काही ‘इन्सोम्नियाक’ आपल्या मनाने उपाय योजत राहतात. ‘दारूचे चार घोट घेतल्याने मला चांगली झोप लागते,’ असे म्हणणारे अनेकजण आपल्याला भेटतात. ‘इन्सोम्नियाक’ रुग्णांपैकी अनेकांना पहाटे लवकर जाग येते तर उर्वरित रुग्णांना रात्री काही मिनिटेच झोप लागते. अनेक दिवस झोपूच न शकलेल्यां रुग्णांची पिडा पाहून आपण निद्रानाशाच्या आजाराचे उग्र स्वरूप समजून घेऊ शकतो. 
२. थकवा असूनही जागरण
रात्री चांगली झोप न लागल्याने सकाळचा ताजेपणा अनेकजण अनुभवू शकत नाहीत, हे चिकित्सकांनी प्रमाणित केलेले वास्तव आहे. पुरेशा झोपेअभावी शरीराच्या चयापचय संस्थेला नुकसान सहन करावे 
लागते. जाग आल्यावर डोके जड वाटणे, सुस्ती जाणवणे अशी लक्षणे यामुळे दिसतात. झोपेतून उठल्यानंतरही सुस्ती येणे आपले आपल्यालाच अजब वाटते.
३. दिवसा सुस्त राहणे
निद्रानाश जडलेल्या व्यक्ती दिवसभर सुस्त जाणवणे, हे सर्वसाधारण लक्षण आहे. अनेकांमध्ये ते दिसून येते. या अवस्थेत अनेकदा दिवसभर मनही अस्वस्थ असल्याचे जाणवत राहते. दिवसभर सुस्ती राहिल्यास त्याचा संबंधित व्यक्तीच्या कामावर आणि सामाजिक जीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्यास सुरुवात होते.
४. चिडचिडेपणा आणि स्वभावात बदल
जेव्हा एखाद्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा येणे स्वाभाविक आहे. अशा व्यक्तींना राग लवकर येतो. शिवाय ते चिंता आणि निराशेच्या आहारी जाऊ शकतात. त्यांची वर्तणूक सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा वेगळीच असते. अशा व्यक्तींना कोणत्याही गोष्टीत लक्ष एकाग्र करण्यात किंवा जुन्या गोष्टी आठवण्यात अडचणी येतात.
५. कायमस्वरूपी नैराश्य
निद्रानाशाचा विकार दुर्लक्षित केल्यास आणि तो दीर्घकालीन बनल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशी व्यक्ती कायमस्वरूपी नैराश्याच्या 
गर्तेत लोटली जाऊ शकते. या ठिकाणी नैराश्य या शब्दाचा अर्थ केवळ तात्पुरती मानसिक स्थिती असा नसून, वैद्यकीय परिभाषेतील नैराश्य अभिप्रेत आहे. अशा व्यक्तीच्या मेंदूतील ‘न्यूरोट्रान्समीटर’ क्षीण होतात. झोपणे हे जेव्हा अत्यावश्यक काम आहे, असे वाटू लागते, तेव्हा निद्रानाशाच्या विकाराने आपल्याला घेरले आहे, असे समजावे. 

काही उपाय
१. अरोमा थेरपी - तणाव हे जर झोप न येण्याचे कारण असेल तर गंधचिकित्सा म्हणजेच अरोमा थेरपी उपयुक्त ठरू शकते. खाली काही तेलांची माहिती दिली आहे. ती निद्रानाशाच्या समस्येशी लढण्यास मदत ठरू शकतात.
गुग्गुळ - हे तेल शामक आणि पीडानाशक आहे. घशाची सूज, खोकला आणि चिंता ही निद्रानाशाची कारणे असतील, तर या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. 
२.चमेली - हे आराम देणारे आणि शांतचित्त होण्यास मदत करणारे तेल आहे. श्‍वसनाच्या तक्रारी आणि निराशा या बाबतीत हे तेल रुग्णाला मदत करू शकते.
लव्हेंडर - हे तेल सर्व प्रकारच्या वेदना, डोकेदुखी आणि शरीर आखडण्यासारख्या समस्या पळवून लावते आणि सुखाची निद्रा प्रदान करू शकते.
३. योग - शरीराचे तंत्र सुव्यवस्थित करण्याचे माध्यम म्हणजे योगासने. तणावमुक्तीसाठी योग फायदेशीर ठरतो. ताणतणावच निद्रानाशाचे प्रमुख कारण ठरतात आणि योगाद्वारे ते दूर करता येतात. शवासन हे एक चमत्कृतीपूर्ण आसन असून, ते व्यक्तीला तणावमुक्त करून सुखाची निद्रा प्रदान करू शकते. हे आसन करण्यास केवळ वीस मिनिटांचा वेळ लागतो.

घरगुती इलाजही शक्य् 

 हिरव्या भाज्यांचे - प्रमाण आहारात अधिक ठेवल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होते. विशेषतः ज्या भाज्यांची पाने मोठी असतात, अशा भाज्या अधिक प्रमाणात सेवन कराव्यात.
 मॅग्नेशियम - आणि कॅल्शियमचे प्रमाण शरीरात संतुलित प्रमाणात राखायला हवे. ही दोन्ही रसायने चांगली झोप प्रदान करणारी मानली गेली आहेत. याखेरीज मॅग्नेशियममुळे हृदयविकाराचा धोकाही कमी करता येतो. मॅग्नेशियम अधिक प्रमाणात खाण्यात आल्यास मात्र डायरियाचा धोका संभवतो. मात्र, माफक प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पोटात जाईल, याची काळजी घ्यावी.
 वाइल्ड लेटयूस - निद्रानाशाची काही कारणे कमी करू शकतो. डोकेदुखी, थकवा, डिप्रेशन आदी कारणांमुळे झोप लागत नसल्यास ही औषधे महत्त्वाची भूमिका बजावू शकते. झोपण्यापूर्वी ही औषधी पायांना ३० ते १२० मिलीग्रॅम या मात्रेत लावावी. यामुळे थकवा गायब होतो आणि झोप लागते.
 हॉप्स - ही अशा प्रकारचीच एक जंगली औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे फळ बिअर बनविण्यासाठी वापरले जाते. निद्रानाश, थकवा, डिप्रेशन आदी लक्षणे दिसू लागल्यास या फळाचा रस घेतल्यास निद्रानाशाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
 ग्रीन टी- दिवसा घेतल्यास खूपच फरक पडतो. या चहात एल-थियानिन नामक आम्ल आढळून येते. ते पोटात गेल्यास दिवसभर ताजेपणा जाणवतो आणि रात्री सुखाची झोप येते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin