Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


‘ग्रीन टी’मधील संयुग 'डाऊन्स सिंड्रोम'वर गुणकारी


Main News

डाऊन्स सिंड्रोम या रोगावर ग्रीन टीमध्ये असलेले संयुग गुणकारी असते असे संशोधनात दिसून आले आहे. संशोधकांच्या मते एपिगॅलोकॅटेशिन गॅलेट या संयुगामुळे मानवी बोधन शक्तीत सुधारणा होते. 

हे संयुग ‘ग्रीन टी’मध्ये असते. त्यामुळे डाऊन्स सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूतील कार्यात्मक सुधारणेसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे दृश्यात्मक स्मृती सुधारते. व्यक्तीचे दोन गट करून काहींना काहीच औषध नसलेली गोळी म्हणजे प्लासेबो, तर काहींना हे संयुग असलेली गोळी दिली असता, ज्यांना औषधी गोळी दिली होती त्यांच्यात चांगला फरक दिसून आला व प्रथमच ‘ग्रीन टी’मधील या संयुगाचे महत्त्व लक्षात आले, असे सेंटर फॉर जिनॉमिक रेग्युलेशन या स्पेनमधील संस्थेच्या मॅरा डियरसन यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, की आमचे हे संशोधन म्हणजे डाऊन्स सिंड्रोमवरील रामबाण उपाय आहे असे आम्ही म्हणणार नाही, पण जास्त लोकांवर हे संयुग गुणकारी ठरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दर हजार लोकांमध्ये एकाला डाऊन्स सिंड्रोम हा रोग असतो व त्यात जनुकीय कारणास्तव बौध्दिक अक्षमता निर्माण होते. सीएसजी व आयएमआयएम या संस्थेने एपिगॅलोकॅटेसिन गॅलेट या संयुगावर संशोधन केले असून, त्यात सेरेब्रल प्लास्टिसिटी व काही बोधनात्मक कार्याशी निगडित गुणसूत्र २१ (डीवायआरके १ ए)चे कार्य नियंत्रितपणे घडवून आणता येते. डाऊन्स सिंड्रोमवरील हे प्रयोग १६ ते ३४ वयोगटातील ८४ व्यक्तींवर करण्यात आले आहेत. 

‘ग्रीन टी’मधील या संयुगाचा वापर केलेल्या लोकांमध्ये दृश्यात्मक बोधनक्षमता व इतर बाबतीत बराच फरक दिसून आला आहे, असे आयएमआयएमचे रफाल द ला टॉर यांनी सांगितले. एपिगॅलोकॅटेसिन गॅलेट हे संयुग डीवायआरके १ ए जनुकाचे अतिरिक्त आविष्करण थांबवते. व यापूर्वी उंदरांमध्ये केलेल्या प्रयोगातही त्याचे चांगले परिणाम दिसले होते. स्मृती, लक्ष केंद्रीकरण, अध्ययन या क्षमता मेंदूतील न्यूरॉन्सच्या जोडणीतील सुधारणांमुळे बदलल्या जाऊन त्यात सुधारणा दिसते. लॅन्सेट न्यूरॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin