Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


ताणतणावावर अशी करा मात


Main News

तुमच्या आजुबाजूला एका वेळी अनेक कामे होत असतात. आजूबाजूचे आवाज, शारीरिक हालचाल, ऐकणं, पाहणं, विविध वास अशा अनेक क्रियांना मेंदू नियंत्रित करत असतो. विविध संवेदना समजून घेत क्रिया करण्याची जबाबदारी मेंदूवर असते. अशा वेळी मेंदू ताण तणावाची लक्षणं दाखवतो. अशा वेळी एखादी गोष्ट कळली नाही. म्हणून आपण त्यांना पुन्हा सांगण्याची विनंती करतो, हे तुमच्या निदर्शनास आले असेल. अनेक चुका तुम्ही दुर्लक्षित करत असतात. उदा. शब्दांचे स्पेलिंग्स, फॅन, गाण्याचे आवाज, टीव्ही अशा चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी तुम्ही कमी करा. बोलणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने वळा आणि नीट ऐकून लिहा. आता तुम्हाला ते शब्द नीट ऐकू येतील. मेंदूला करावे लागणारे मल्टीटास्किंग काम कमी केलं तर कामे पटापट होतील. 

 कदाचित शेवटचे फिरायला कधी गेला होतात, हे तुम्हाला आठवत नसेल. तर वेळ काढा आणि घरातून बाहेर पडा. एका सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, मानसिक तणाव आणि तुमचा पडता काळ निर्माण करणाऱ्या गोष्टी कमी केल्या तर मानसिक ताण कमी होतो. तेव्हा कामाच्या ठिकाणी तुमचा पडता काळ सुरू असेल. तर एक ब्रेक घ्या आणि घराबाहेर पडा. मनात येणारे विचार कमी झाले ही ताणही आपोआप कमी होतो. शिवाय कमी महत्त्वाची कामे पुढे ढकलली तर खांद्यावरचा भारही कमी होतो. ऑफिसच्या वेळेत जवळपास मारलेली एखादी चक्कर, स्पा किंवा थोडा व्यायाम सुद्धा तुमचा मेंदू रिफ्रेश करू शकतो. 

 दडपणसुद्धा मानसिक तणावाचे एक लक्षण असू शकते. त्यामुळे तुम्ही निराश होतात आणि मेदूला शांततेची गरज असते. कारण अशा वेळी मानसिक ऊर्जा कमी असते. त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत आणि तुम्हाला रागही लगेच येतो. 

 मानसिक तणावाची शारीरिक लक्षणंही आहेत. डोकंदुखी, पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता, भूक कमी होणे, निद्रानाश आणि भीती वाटत राहाणे ही मानसिक तणावाची कारणे असू शकतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांची मदतही घेऊ शकतात. 

 विसरभोळेपणा हेही मानसिक तणावाचे लक्षण असू शकते. तुमचा मेंदू सगळी महिती एकाच वेळी घेऊन त्यावर प्रक्रिया करत असतो. पण त्याच वेळी ती प्रत्येक गोष्ट तो लक्षात ठेवत नाही. आपण झोपी गेल्यावर तो हे काम सुरू करतो. तेव्हा मधल्या वेळेत एखादी गोष्ट खूप वेळ लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी डोक्याला ताण देऊन कराव्या लागणार नाही अशा गोष्टी कराव्यात. जेणेकरून त्याचा ताण येत नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin