Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


हवेच्या प्रदूषणामुळे मृत गर्भ जन्माच्या संख्येत वाढ


Main News

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आला असून सर्वच देशांनी हा विषय गांभीर्याने घेण्याचे ठरवले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. याबाबत संशोधकांनी केलेल्या संशोधनातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर येऊ लागले आहेत. 

हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिलांवर होत असून त्यामुळे मृत गर्भ जन्माचा धोका अधिक असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. २०१५मध्ये जगभरात २.६ दशलक्ष मृत गर्भ जन्म झाल्याचे समोर आले आहे. भौगोलिक फरकामुळे या घटना घडल्या असून त्या टाळता येण्यासारख्या होत्या, असे फिनलॅण्डच्या ओऊल विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत १३ संशोधन प्रबंध सादर करण्यात आले आहेत. गर्भधारणेच्या तिसऱ्या टप्प्यात हवेच्या प्रदूषणाचा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी यामध्ये नमूद केले आहे. 

चार मायक्रोग्राम प्रति क्युबिक मीटर या प्रमाणात धोक्याची पातळी वाढते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड यांसह १० इतर वायू आणि ओझोनमुळेही मृतगर्भजननेचा धोका वाढतो, असेही त्यांनी सांगितले. कोपनहेगन विद्यापीठाचे अभ्यासक मॅरी पीडरसेन म्हणाले की, सभोवतालची हवा, लोकसंख्या आणि मृतगर्भजनना या विषयांवर भविष्यातही अभ्यास सुरूच राहील.

 सध्याचा अभ्यास, हवा प्रदूषणाचे नमुने आणि मृतगर्भजननेसंबंधीचा अभ्यास यांमुळे हवा प्रदूषणामुळे मृतगर्भजननेचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते, असे संशोधकांनी सांगितले. या विषयातील संशोधन ‘जनरल ऑक्युपेशन अ‍ॅण्ड एन्व्हॉर्नमेंटल मेडिसिन’ या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin