Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


व्यायामामुळे तेरा प्रकारच्या कर्करोगाचा प्रतिबंध


Main News

व्यायामामुळे शारीरिक तंदुरुस्ती येते हे सर्वज्ञात आहे. कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम केल्याने अनेक आरोग्याचे फायदे मिळतात, जास्तीत जास्त शारीरिक हालचाली केल्याने तेरा प्रकारच्या कर्करोगाला रोखता येते, असा दावा एका नवीन संशोधनानुसार अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टि्यूटच्या संशोधकांनी केला आहे. 

 अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टि्यूटचे स्टीव्हन सी. मूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिका व युरोपातील बारा अभ्यासांतील निष्कर्षांच्या आधारे हे संशोधन केले आहे. ही माहिती १९८७ ते २००४ या काळातील संकलित केली आहे. शारीरिक क्रियाशीलता व सव्वीस प्रकारचे कर्करोग यांचा संबंध तपासून पाहण्यात आला. त्यात १४ लाख लोक व १ लाख ८६ हजार ९३२ कर्करोगग्रस्त यांचा समावेश होता. 

अकरा वर्षांच्या त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांची शारीरिक कार्यक्षमता जास्त होती, जे व्यायाम करीत होते त्यांच्यात २६ पैकी १३ कर्करोगांची शक्यता कमी झाली होती. एसोफेगल अ‍ॅडेनोकार्सिनोमा (४२ टक्के), यकृत (२७ टक्के), फुफ्फुस (२६ टक्के), मूत्रपिंड (२३ टक्के), गॅस्ट्रिक कार्डिया (२२ टक्के), एंडोमेट्रियल (२१ टक्के) याप्रमाणे कर्करोगाची शक्यता कमी झाली. नियमित व्यायामाने मायलॉइड ल्युकेमिया (२० टक्के), मायलोमा (१७ टक्के), कोलन (आतडे) (१६ टक्के), डोके व मान (१५ टक्के), रेक्टल (१३ टक्के), पित्ताशय (१३ टक्के) व स्तन (१० टक्के) याप्रमाणे कर्करोगाची शक्यता कमी झाली. 

अर्थात यात शरीराचे आकारमान व धूम्रपानाची सवय या घटकांचा विचार केलेला नाही. सर्व प्रकारच्या कर्करोगांची शक्यता शारीरिक व्यायामाने ७ टक्के कमी होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘जेएएमए’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin