Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


हवामान बदलामुळे किडनीच्या विकारांत वाढ


Main News

जागतिक हवामान बदलाच्या समस्येमुळे अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. जगभरात आता किडनीच्या (मूत्रपिंड) विकारांने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढल्याची माहिती  एका संशोधनातून समोर आली आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील वैद्यकीय विभागातील रिचर्ड जॉन्सन आणि जे लेमरी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने  निकाराग्वातील ला इस्ला फाऊंडेशनचे जेसन ग्लेसर यांच्यासह हा अभ्यास केला. 

त्याचे निष्कर्ष ‘क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधकांच्या मते जगभर हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे उष्णता वाढत आहे, पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी, विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांना आणि कामगारांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. उन्हामध्ये काम करताना ग्रामीण कामगारांना आरोग्याच्या खूपच कमी सुविधा उपलब्ध असतात.

 उष्णतेमुळे घामातून शरीरातील पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढलेले असते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्याने आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची फारशी सोय नसल्याने पुरेसे पाणी प्यायले जात नाही. बरेचदा उपलब्ध असलेले पाणी शुद्ध नसते. त्यातून जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीमुळे ‘हिट स्ट्रेस’ आणि ‘क्रॉनिक किडनी डिसिझेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समस्या निर्माण होतात. त्यातून किडनीचे विविध आजार सुरू होतात.

जगाच्या विविध भागांत, जेथे उष्णता जास्त आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि लोकांची क्रयशक्ती कमी आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचे आजार उद्भवू शक्यता असा इशारा  संशोधकांनी दिला आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin