Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


डोळ्यांची सुदृढता राखण्यासाठी योग्य व्यायामाची आवश्यकता


Main News

डोळे हा मानवी शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. सतत जागरण, अवेळी खाणं यामुळे आपण स्वतःच डोळ्यांचे आरोग्य धोक्‍यात आणतो. मग डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात, डोळ्यांतून सतत पाणी वाहते. चक्कर, डोकेदुखी असे त्रास सूरू होतात. डोळा फार नाजूक आणि संवेदनशील अवयव आहे. तो संपूर्ण शरीराशी आंतरिक पद्धतीने जोडलेला असतो. डोळ्यांची सुदृढता उत्तम राखण्यासाठी योग्य व्यायामाची आवश्यकता असते. अशा काही व्यायाम प्रकाराची माहिती खाली दिलेली आहे.

 डोळ्यांचे व्यायम डोळ्यांना खास आराम मिळवून देतात. हे व्यायाम रोज दिवसातून अर्धातास केल्यास तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. व्यायाम करताना कसे बसावे डोळ्यांचा व्यायाम करताना ताठ, आरामदायी आसनात बसा. खांदे सैल ठेवा. संपूर्णपणे निवांत राहा आणि शरीर सैल सोडा. मान सरळ आणि ताठ असू द्या. व्यायाम करताना शरीराची जास्त हालचाल करू नका. डोळ्यांची वर, खाली हालचाल मान सरळ ठेऊन डोळ्यांनी वरच्या दिशेने पाहा. आणि मग, डोके खाली न करता आहे, त्या स्थितीत राहून डोळ्यांनी खालच्या दिशेने पाहा. म्हणजेच डोळ्यांची वर-खाली पद्धतीने हालचाल करा. हा व्यायाम करताना मंद गतीने (हळूहळू) डोळ्यांची हालचाल करावी. ही प्रक्रियेची दहा वेळा पुनरावृत्ती करा. डोळ्यांची आजुबाजूला हालचाल वर सांगितल्या प्रमाणेच मान सरळ ठेऊन डोळ्यांनी प्रथम उजव्या दिशेकडे पाहा आणि मग डाव्या दिशेकडे पाहा. म्हणजेच डोळ्यांची उजवीकडे आणि डावीकडे अशी आजुबाजूला हालचाल करा. व्यायाम करताना मंद गतीने (हळूहळू) डोळ्यांची हालचाल करावी. या प्रक्रियेची दहा वेळा पुनरावृत्ती करा.

 डोळ्यांची तिरपी हालचाल मान सरळ ठेऊन डोळ्यांनी वरच्या दिशेने उजव्या कोपऱ्यात पाहा आणि नजर तिरप्या दिशेने खाली आणून डाव्या कोपऱ्यात पाहा. ही प्रक्रिया सहा ते आठ वेळा करा. आता अशाप्रकारे पण दिशा बदलून डोळ्यांची तिरपी हालचाल करा. म्हणजेच डोळ्यांनी वरच्या दिशेने डाव्या कोपऱ्यात पाहा आणि नजर तिरप्या दिशेने खाली आणून उजव्या कोपऱ्यात पाहा. या प्रक्रियेची देखील सहा ते आठ वेळा पुनरावृत्ती करा. डोळ्यांची वर्तुळाकार हालचाल मान सरळ ठेऊन डोळे वर्तुळाकार म्हणजेच प्रथम डोळे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे गोल फिरवावे. ही प्रक्रिया सहा ते आठ वेळा करावी आणि नंतर अशाचप्रकारे फक्त विरुद्ध पद्धतीने म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने गोल फिरवावीत. या प्रक्रियेची देखील सहा ते आठ वेळा पुनरावृत्ती करा.

 जवळ आणि दूरची दृष्टी एखादी पेन्सिल घेऊन ती डोळ्यांपासून काही अंतरावर सरळ दिशेने धरा. दोन्ही डोळ्यांनी सर्वप्रथम त्या पेन्सिलीकडे लक्ष केंद्रित जरा. जोपर्यंत ती पेन्सिल स्पष्ट दिसत नाही, तो पर्यंत तिच्याकडे पाहा. त्यानंतर डोळे न मिचकवता पेन्सिलीपासून लक्ष विचलित करून पेन्सिलच्या दिशेनेच समोरच्या बाजूला पाहा. जेणेकरून पेन्सिल आता अंधुक दिसेल आणि समोर एखादी वस्तू किंवा भिंत स्पष्ट दिसेल. ही प्रक्रिया सहा ते आठ वेळा करा.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin