Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


तमालपत्र खान्याचे फायदे


Main News

- तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आढळून येते. 

याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.

तमालपत्राचे फायदे :

१. तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

२. तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे.  

३. तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.  

४. तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.  

५. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्र हा त्यावर चांगला उपाय आहे. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो. 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin