Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


हिवाळ्यातील आजार


Main News

हिवाळ्यात अनेक आजार उद्‌भवतात. मात्र त्यात सर्वाधिक होणारा आजार म्हणजे सर्दी. पिण्याचं पाणी गरमच वापरावं, उबदार वातावरणात राहावं, थंडी रोखणारे गरम कपडे वापरावेत, थंड पाणी बिलकुल न पिणं किंबहुना चहासारखं गरम गरम पाणीच पिणं, तुलनेने कमी ओलसर अथवा कोरडे अन्न खावं. या काळजीबरोबरच साधं तिळाचं तेल किंचित संधव घालून गरम करून छाती व पाठीला मालीश करणं फार उपयुक्त ठरतं. अशा वेळी लोकरीचे उबदार कपडे वापरणं व घराबाहेर पडण्याअगोदर कोमट केलेलं तिळाचं तेल नाकपुडयांना आतून लावणं अगत्याचं ठरतं. 

दमा - कडाक्याच्या थंडीमुळे वाढणारा आणखीन एक महत्त्वाचा आजार म्हणजे दमा. याला आयुर्वेदात ‘श्वासव्याधी’ या नावाने ओळखलं जातं. हा आजार सुरुवातीला सर्दीनंतर खोकला आणि याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अथवा हलगर्जीपणामुळे, सर्दी ठीक झालेली नसतानाही अपथ्य केल्याने, अधिक काळ पाण्यात किंवा दमट वातावरणात राहिल्याने, सातत्याने वातानुकूलित जागेत वावरल्यामुळे, थंड जल किंवा इतर शीत जलीय पदार्थाचं सेवन केल्याने थंड वाऱ्यावर पुरेसं गरम कपडे न घालता फिरल्याने, स्वभावत: शीत अर्थात् थंड असलेले पदार्थ खाण्या-जेवणात आल्याने अशा अनेक कारणांमुळे होतो. श्वास घ्यायला त्रास होणं, नाक सातत्याने चोंदलेलं राहणं, बसल्या जागीही धाप लागणं, अशी लक्षणं दिसू लागतात.  हळूहळू हा आजार बळावत जातो आणि कफ वाढून होणारा दमा हा आजार जडतो. दमा या आजारात श्रम न करताही बसल्या जागीच दम लागल्यासारखी स्थिती होऊन प्रयत्नपूर्वक श्वास घेण्याची गरज भासू लागते. या आजारामध्ये औषधोपचार घेऊनही वारंवार हाच त्रास होत राहतो आणि याला शास्त्रीय भाषेत ‘दम्याचे वेग येणं’ किंवा बोलीभाषेत ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हटलं जातं.

सर्वसाधारणपणे याची सुरुवात नाकातून पाणी गळण्यापासून होते. हळूहळू घशात कफ जमू लागतो. खूप प्रयत्न करून, खाकरून तो काढण्याचा प्रयत्न केला तरी अतिप्रयत्नांनंतर थोडासा कफ सुटतो, अत्यंत चिकट स्वरूपाचा हा कफ थोडासा बाहेर पडल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. सोबत श्वासोच्छ्वासाच्या क्रियेसही त्रास जाणवू लागतो. कफ सुटल्यावरचं बरं वाटणं अल्पकाळच टिकतं. पुन्हा चिकट कफ एकत्र होतो. श्वासोच्छ्वासाच्या वेळी घुरघुर वाढते, पोट फुगतं, तोंडाची चव जाते, खोकल्याची उबळ येते आणि बरंच खोकल्यानंतर थोडासा आणि तोही अत्यंत चिकट असा थोड्या प्रमाणात कफ बाहेर पडतो. तब्येत ठीक झाल्याची जाणीव होते, पण तीही थोड्या वेळापुरतीच. पुन्हा कफ जमणं, खोकल्याची उबळ येणं, दम लागणं, असं सातत्याने चालूच राहतं. कालांतराने तर छातीचा पिंजराही गोलाकार होऊ लागतो.

काय उपाय कराल?
छाती व पाठ गरम पाण्याच्या पिशवीने – गरम पाण्याने शेकल्याने तात्पुरतं बरं वाटतं आणि तेही अगदी तात्पुरतंच! साधारणत: २० ते २५ मिनिटांत श्वास घेताना घुरघुर आवाज येणं, झोपल्यावर त्रास वाढणं व उठून बसल्यावर थोडं बरं वाटणं, त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, श्वास घेताना कष्ट झाल्याचं जाणवणं अशी स्पष्ट लक्षणं पुन्हा दिसू लागतात. अशा वेळी तत्काळ फायदा मिळतो तो म्हणजे छातीला व पाठीला गरम केलेल्या तेलाने मालिश करूनच. फुप्फुसांच्या आतील भागाला चिकटून असलेला चिकट कफ आतल्या भिंतींपासून सुटायला मदत होते आणि गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीने मिळालेल्या उष्णतेमुळे हा कफ पातळ होऊन सुटू लागतो. पातळ झालेला कफ मुखावाटे थुंकून टाकता येतो व आजारी व्यक्तीला आराम मिळतो. प्रौढ व्यक्तींनी दम्यासाठी छातीला मीठ घातलेलं तिळाचं तेल लावून शेकून घ्यावं व सातत्याने गरम-कोमट पाणी पिणं हे उपयोगी व लाभदायक ठरतं.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin