Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


मधुमेह रुग्णांना वायू प्रदुषणांचा अधिक धोका


Main News

मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहणे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

बोस्टनच्या हार्वर्ड महाविद्यालयातील मेडीकल विषयामध्ये झालेल्या एका संशोधनात असे निरीक्षणास आले की, मधुमेह झालेल्या महिलांना हृद्याशी संबंधीत आजार फार लवकर होतो. ६४ वयापर्यंतच्या १,१४,५३७ महिलांचा या संशोधनाच्या वेळी निरीक्षण करण्यात आले.

हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

१९८९ ते २००६ पर्यंत चाललेल्या संशोधनात असे निरीक्षण हाती आले की, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या महिलांना हृदयाशी संबंधित आजार लवकर होतात. हे सर्व होण्यास वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. कारखाने, वाहने, वीज निर्मिती केंद्र यांच्या मधून निघणाऱ्या धुरातील कणांचे ही परीक्षण केले आहे.

मधुमेह आहे, घ्या आंब्याच्या पाणाचा रस 

टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.

आंब्याच्या पानांचा असा वापर करू शकतो

प्राचीन चीनी औषधांमध्ये आंब्याच्या पानांचा अर्क डायबिटीज आणि अस्थमाच्या उपचारांमध्ये वापरला जायचा. आंब्याच्या पानांमध्ये कॅफिक अॅसिड सारख्या फिनॉलिक, मॅगीफेरिन सारख्या पॉलिफिनॉल्स, गॅलिक अॅसिड, फ्लेवोनोइड्स असे अनेक घटक आढळतात. हे सर्व गुण आंब्याला अँटी-बायोटिक, अँटी ऑक्सीडंट आणि अँटी-अॅलर्जिक नैसर्गिक उत्पादन बनवतात.

आंब्याचे खास गुण

ब्लड शुगरवर नियंत्रण  आंब्याच्या पानांमध्ये असलेल्या टॅनिनमुळे होतं. आंब्याच्या पानांपासून निघालेला अर्क इंसुलिन उत्पादन आणि ग्लूकोजचा प्रसार आणि ब्लड शुगरची मात्रा कमी करतो. 
कोलेस्ट्रॉल कमी करतो - आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मधुमेह आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अंगांना प्रभावित करतो आणि हृदय त्यातील एक आहे. कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण आपल्या हृदयाला नुकसान पोहोचवू शकतं. जर आपण मधुमेहानं त्रस्त असेल तर इतर आपोआप खराब व्हायला लागतात. आंब्याच्या पानांमध्ये फायबर, पॅक्टिन आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल खासकरून एलडीएल या हानिकारक कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करतो. याशिवाय फळात असलेल्या फ्लेवोनोविड्स लिपिड लेव्हलही कमी करण्यात मदत होते. यामुळं आपल्या व्हेन्स मजबूत आणि स्वस्थ होतात.

डायबिटीक रेटिनोपॅथीचा उपचार: आंब्याच्या फळासोबतच पानांमध्येही व्हिटॅमिन ए असतं. जे डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे. हेच कारण आहे की, पानंही डोळे खराब होण्यापासून वाचवू शकतात.

किडनी आणि लिव्हरचं आरोग्य: मधुमेहामुळं किडनी फेल होणं खूप सामान्य आहे. अनियंत्रित ब्लड शुगर लेव्हलमुळे ही मोठी समस्या होते. आंब्याचं सेवन केल्यानं ही समस्या कमी होण्यास खूप मदत मिळते. आंब्याच्या पानांमुळे किडनी स्टोन सारखी समस्या दूर होते आणि किडनी आरोग्यवर्धक ठेवण्यासाठी मदत मिळते. याचसोबत आपल्याला पित्ताशयाच्या आजारांपासूनही मुक्ती मिळते. 

अशा पध्दतीने वापरा आंब्याची पाने 

- हलक्या हिरव्या रंगांची छोट्या आकाराची आंब्याची पानं तोडून ती चांगल्या पध्दतीनं धुवून घ्यावी आणि छोटी-छोटी कापून चावावीत.
- आंब्याची पानं तोडून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी खावीत. लक्षात ठेवा उपाशी पोटीच हे खावं.
- पानांना धुवून उन्हात वाळत घाला आणि पावडर बनवून घ्या. एक चमचा हे पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावं. रोज सकाळी याच सेवन केल्यान ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin