Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

आरोग्य


हिवाळ्यात खारीक खाण्याचे फायदे


Main News

हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते,  कारण हे फळ वाळलेल्या स्वरुपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते. थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.

बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर (१२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि. ली दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.

खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि २५० मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करा. याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर राहतील.

- भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

- सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.

- खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणार्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल.

- खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.

- खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin